राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. दरम्यान , मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील जोरदार तयारीत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने राज ठाकरे यांनी सभेत भाषण करण्याचे टाळले.
भिवंडीत आयोजित केलेल्य जाहीर सभेत प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने राज ठाकरेंनी भाषण करण्याचे टाळले. व्यासपीठावर न जाता राज ठाकरे थेट मनसैनिकांशी संवाद साधण्यासाठी गेले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांच्या भाषणात सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत हे उमेदवार विजयी झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी नक्की येईल असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी ग्रामीणच्या उमेदवार वनिता कथोरे,भिवंडी पूर्वचे उमेदवार मनोज गुळवी,शहापूरचे उमेदवार हरिश्चंद्र खांडवी,विक्रमगडचे उमेदवार सचिन शिंगडा यांच्या प्रचारार्थ भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर दुपारी राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.