मोठी बातमी ! आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडेंवर गुन्हा दाखल
मोठी बातमी ! आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडेंवर गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
 राज्यात उद्या विधानसभा  निवडणूक पार पडनार असून राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि विरारचे भाजपचे उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार कॅश कांड आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

वसईच्या तुळींज विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तेथे पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला नऊ लाख 93 हजार पाचशे रुपये सापडले आहेत. त्याचबरोबर इतर कागदपत्रेही सापडले आहेत. त्या पद्धतीने कार्यवाही सुरू असून पोलिसांनीसुद्धा तशी तक्रार दाखल केली आहे. या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे एक तासाच्या आत सदर बाबतीत गुन्हाही दाखल करण्यात येईल असे मत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला आहे.

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर विनोद तावडे थांबलेल्या विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांची कॅश आढळून आली. विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटणार असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. त्यानंतर प्रकरण चांगलंच तापलं.

दरम्यान आता या सर्व प्रकरणानंतर भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद तावडे आणि उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्यानं विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमधील तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण? 

 विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला आहे. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांची कॅश आढळून आली. त्यानंतर तब्बल साडेतीन तास बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडे यांना घेराव घालण्यात आला होता.

याबाबत बोलताना बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. विनोद तावडे पैसे वाटणार असल्याची टीप आपल्याला भाजपमधूनच मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group