बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' या सिनेमाला अखेर रिलीज डेट मिळाली आहे. अभिनेत्री कंगनाने सोशल मीडिया वरून ही माहिती दिली. सेन्सॉर बोर्डाकडून इमर्जन्सी सिनेमाला परवानगी मिळाली आहे. तसेच हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आ
या सिनेमाच्या रिलीज डेटविषयी मागील अनेक दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरु होत्या कारण या सिनेमाला अद्यापही रिलीज डेट मिळाली नव्हती. तसेच वारंवार त्याच्या प्रदर्शनाचा तारखा देखील बदलण्यात येत होत्या. पण आता अखेरीस ही प्रतीक्षा संपली आहे. कारण या सिनेमाला आता रिलीज डेट मिळाली असून कंगनानेच याविषयी माहिती दिली आहे.
कंगना रणौतने तिच्या सोशल मीडिया वर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याचसोबत कंगनाने लिहिलं की, '17 जानेवारी 2025 - देशातील सर्वात शक्तिशाली महिलेची कथा आणि भारताचे नशीब बदलणारा क्षण. यावर आधारित 'इमर्जन्सी' हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.