नाशिकमध्ये गारठा ! पुढील 24 तासांमध्ये राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती काय  ?
नाशिकमध्ये गारठा ! पुढील 24 तासांमध्ये राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती काय ?
img
दैनिक भ्रमर
राज्यात थंडीचा जोर वाढला असून नाशकमध्येही गारठा वाढला आहे. मागील आठवाड्यापासून थन्डीचा जोर वाढला असून सध्या  नाशिक मधील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवल्या गेली आहे. पुढील काही दिवस राज्यातील वातावरण अंशतः ढगाळ असणार आहे. 

दरम्यान उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. कोकण विभागात सुद्धा 23 नोव्हेंबरला कोरडे वातावरण असणार आहे . पुण्यामध्ये 23 नोव्हेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.  पुण्यातील किमान तापमान वाढले गुरुवारच्या तुलनेत थंडीचा जोर कमी राहील. तसेच , छत्रपती संभाजी नगरमध्ये निरभ्र आकाश राहणार असून तेथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरड हवामान पाहायला मिळेल.

विदर्भात 23 नोव्हेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश राहणार आहे. नागपूरमध्ये 23 नोव्हेंबरला कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असेल. विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातील किमान तापमानात सर्वाधिक घट झाल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असेल.


इतर बातम्या
Join Whatsapp Group