बहुप्रतीक्षित विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आलं आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी आणि महायुती सोबत मैत्री साठी अटीच ठेवल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
दरम्यान, मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात छोटे पक्ष आणि अपक्षांची बार्गेनिंग पावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या पक्षांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही एक महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
ते बोलत होते, आम्हाला मंत्रिमंडळात भागीदारी पाहिजे. आमची इच्छा आहे, जर 12 आमदार आमचे आले तर 12 चे 12 कॅबिनेट मिनिस्टर झाले पाहिजे. आणि जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्रीपण आमचा पक्षाचा झाला पाहिजे. त्यांनी हे मान्य केलं तर आम्ही त्यांच्या वेलकम करू. तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा”, अशा अटी महादेव जानकर यांनी सांगितल्या.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले “महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींचा मी आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. लोकशाहीचा उत्सवामध्ये मतदारांचा टक्का वाढल्यामुळे अभिनंदन करतो. हा जो टक्का वाढलेला आहे तो परिवर्तनाची शक्यता असू शकते”, असं मोठं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं.
“आज माझं एवढंच म्हणणं आहे की, आम्ही खातं खोलतोय. पाठीमागच्या विधानसभेत माझा एक आमदार होता आणि वरच्या सभागृहात एक असे दोन आमदार होते. पण आता आमचे दोनाचे चार, चाराचे सहा वाढतील. जनतेचा कौल शेवटी, त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला चांगलं यश मिळेल, असा मला भरोसा आहे”, असं महादेव जानकर म्हणाले.
“जर मेजॉरिटी महाविकास आघाडी किंवा महायुतीला असेल तर आमचा कोणाला विरोध असेल असं नाही. मी सध्या महाविकास आघाडी बरोबर पण जायला तयार आहे आणि महायुती बरोबर पण जायला तयार आहेत. सध्यातरी 50-50 टक्के दोघांची शक्यता आहे. आम्ही सध्या तरी महायुती बरोबर पण नाही आणि महायुती बरोबर पण नाही. आम्ही छोटे पक्ष असल्यामुळे किंग मेकर ची भूमिका अदा करणार आहोत”, असं जानकर म्हणाले.
महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आम्हाला कोणाच्या निमंत्रण किंवा फोन आलेला नाही आणि आम्ही बिन बुलाय कोणाकडे जाणार नाही. आम्हाला मंत्रिमंडळात भागीदारी पाहिजे. आमची इच्छा आहे, जर 12 आमदार आमचे आले तर 12 चे 12 कॅबिनेट मिनिस्टर झाले पाहिजे. आणि जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्रीपण आमचा पक्षाचा झाला पाहिजे. त्यांनी हे मान्य केलं तर आम्ही त्यांच्या वेलकम करू. तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा”, अशा अटी महादेव जानकर यांनी सांगितल्या.