काल राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल झाला असून या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
तसेच, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार ठराव पास करुन याबाबत भूमिका घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. भाजपचे निरिक्षक दिल्लीतून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर यावर निर्णय होणार आहे. मात्र त्या आधीच महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नावासंदर्भात आग्रही असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ड्रमायन , महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत मिळविला असून महाविकास आघाडीलामोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या.