बारामतीत अजित पवार  40 हजार मतांनी पराभूत होतील, शरद पवार गटाच्या ''या'' नेत्याचा दावा
बारामतीत अजित पवार 40 हजार मतांनी पराभूत होतील, शरद पवार गटाच्या ''या'' नेत्याचा दावा
img
दैनिक भ्रमर
काल राज्यभरात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रतिक्रिया पार पडली. दरम्यान,  या पार्श्ववभूमीवर  राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार याविषयी अनेक चर्चाना उधाण आले असून बारामतीत अजित पवार  40 हजार मतांनी पराभूत होतील असा दावा शरद पवार गटाच्या नेत्याने केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आणि माळशिरस मतदारसंघातील उमेदवार  उत्तम जानकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा मोठा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. अजित पवार यांचा 40,000 मतांनी पराभव होईल, असं भाकित उत्तम जानकर यांनी केलं आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघातअजित पवारांचा मोठा पराभव होण्याची शक्यता उत्तम जानकर यांनी वर्तवली आहे. 

अजित पवार यांचा 40,000 मतांनी पराभव होईल. अजित पवारांना मिळालेले मत म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीचं मत आहे. बारामती तालुका हा सोपा नाही. या मतदारसंघातील उमेदवाराने राज्यात सत्ता स्थापित केली होती. त्यामुळे बारामतीत भाजप किंवा अजित पवार गटाचा पराभव निश्चित आहे. युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित आहे, असं भाकित उत्तम जानकर यांनी केलं आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group