विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांचे प्रचार सुरु आहेत. या दरम्यान नेत्यांचे अनेक आरोप प्रत्यारोप, आणि गौप्यस्पोट अशी खेळी सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निर्भय बनो च्या सभेचं आयोजन बारामतीमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार द्यायच्या तयारीत होते, पण त्यांनी माघार का घेतली? याचं कारण असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठा फायदा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी जरांगे पाटलांचा मोठा हातभार राहणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर मी जरांगेंशी बोललो, माझे भाग्य त्यांनी आपलं ऐकलं आणि निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ते असिम सरोदे यांनी केला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यासह शरद पवारांच्या भगिनी आणि एनडी पाटील यांच्यात पत्नी सरोज पाटील, शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना असीम सरोदे यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत गौप्यस्फोट केले आहेत.