विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती आणि मविआमध्ये मुख्यमंत्री कोण? याची जोरदार चर्चा रंगली होती. अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले.
आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले की, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, तर, महायुती सरकार मुख्यमंत्री ठरवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय महायुतीचे मित्रपक्ष घेतील, असे सांगितले.
एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील,असा काही जणांनी अंदाज वर्तवला होता. आता एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलेय. एका वृत्त संस्थेशी बोलताना एकनाथ शिंदेंनी सांगितले.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. महायुतीला विजयी करणं आणि महाराष्ट्राचा विकास करणं, महाराष्ट्रात उद्योग आणणं, हे उद्धिष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. आमचं मविआसारखं नाही, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती आणि मविआ यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरु झल्या. प्रत्येकवेळी वेगवेळी नावं समोर येत आहेत. प्रत्येक पक्षाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.