१५ नोव्हेंबर २०२४
आगामी निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला. राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा विद्यामंदीर बांधा आणि गडकिल्ले सुधारा, अशा शब्दात राज ठाकरेंनी सुनावले.
Copyright ©2024 Bhramar