पंढरपूर : सोलापूरच्या अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या पार्कमधील पाळा तुटून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पर्यटक माळशिरस तालुक्यातील होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघात झाला.
पार्कमधील पाळणा तुटल्याने खाली पडून एक पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. दोन्ही पर्यटक माळशिरस तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर अकलूज पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
नेमकं काय घडलं?
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधु जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीच्या वॉटरपार्कमध्ये अपघात झाला आहे. अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये हा अपघात झाला. वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने चार जण जखमी झाले. त्यातील भिगवण येथील तुषार धुमाळ नावाच्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोघे किरकोळ जखमी आहेत.