पुलावरून कार कालव्यात कोसळल्याने पत्नीसह सासू-सासर्‍याचा बुडून मृत्यू
पुलावरून कार कालव्यात कोसळल्याने पत्नीसह सासू-सासर्‍याचा बुडून मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
सोलापूर (भ्रमर वृत्तसेवा) :- कार अचानक कालव्याच्या पुलावरून खाली पडल्याने झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. पण चालक थोडक्यात बचावला. त्याच्या डोळ्यासमोरच बायको आणि सासू-सासर्‍यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंढरपूरच्या नातेपुतेजवळ निरा उजवा कालव्याच्या पुलावरून ही ईटिर्र्गा गाडी कालव्यात पडली. त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईवरून फोंडशिरसकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच पालीस पथकाने पाटबंधारे खात्याच्या शाखा अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू केले. परंतु तिघांना वाचवू शकले नाहीत. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातग्रस्त गाडीतील प्रवाशी मूळचे सातारा जिल्ह्यातील दुधबावी येथील रहिवासी आहेत. ते मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. फोंडशिरस येथे येत असताना आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

गाडी चालक सुनील टिळेकर हा बचावला असून, या गाडीत त्याची पत्नी व सासू, सासरे मयत झाले आहेत. पोलिसांकडून या घटनेची नोंद केली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेचा तपास केला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group