मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे मुख्य सचिव ; आज स्वीकारणार कार्यभार!
मोठी बातमी! महाराष्ट्राला मिळाले नवे मुख्य सचिव ; आज स्वीकारणार कार्यभार!
img
Dipali Ghadwaje
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक हे आज (सोमवार) निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता मुख्य सचिवपदाची सुत्रे राजेशकुमार मीना यांच्या हाती येणार आहेत. सरकारने त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. ते आजच सायंकाळी चार वाजता कार्यभार स्वीकारतील.

महाराष्ट्रला नवे मुख्य सचिव मिळाले आहेत. १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेशकुमार मीणा यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. आज दुपारी चार वाजता ते आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. मुख्य सचिव हे राज्यातील सर्वोच्च आयएएस पद आहे. मुख्यमंत्री यांचे मुख्य सल्लागार म्हणून मुख्य सचिव काम करतात. 

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून ते कार्यरत होते. सुजाता सौनिक यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक आजच निवृत्त होत आहेत. राजेशकुमार यांचा मुख्य सचिव म्हणून कार्यकाळ जुलै आणि ऑगस्ट २०२५ या दोन महिन्यांचा असेल. ऑगस्ट २०२५ मध्ये ते निवृत्त होणार आहेत.

राजेशकुमार मीणा यांनी यापूर्वी महसूल विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिलेय. राजेशकुमार यांच्या अनुभवाचा फायदा राज्याच्या विकास प्रकल्पांना होईल, अशी अपेक्षा अधिकारी वर्गातून केली जात आहे. याशिवाय, त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय कामकाजाला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.         

राजेशकुमार, 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी विविध विभागामध्ये काम केले आहे. राजेशकुमार यांनी यापूर्वी ग्रामीण विकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे आणि आता ते महसूल आणि वन विभागात कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र प्रशासनात स्थिरता आणि सातत्य राखण्याची अपेक्षा आहे.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group