राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून पुढील काही दिवसांत सर्व पक्षाचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात सभांचा धडाका लावणार आहेत. प्रचारासाठी फक्त चार दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजीपार्कवर कोणत्या ठाकरेंची सभा होणार याची चर्चा होती. परंतु आज अखेर राज ठाकरे यांनी आपण शिवाजी पार्कवर सभा घेणार होतो, परंतु अद्याप परवागनी माझ्याकडे न आल्याने ती मी रद्द करत आहे असे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची सभा होणार नाहीये.
त्यामुळे संध्याकाळची शेवटची प्रचार सभा 17 नोव्हेंबरला घेता येणार आहे. मनसे आणि ठाकरे गटाकडून शेवटच्या सभेसाठी मुंबईतील शिवाजी पार्कसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यामुळे कोणत्या ठाकरेंना परवानगी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. परंतु अद्याप कोणालाही परवानगी मिळाली नाही. अखेर राज ठाकरे यांनी आपण सभा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.