जोडप्यातील नाते तुटले म्हणून पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काल म्हणजेच बुधवारी एका पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा खटला फेटाळून लावताना दिला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सहमतीने संबंध असलेल्या जोडप्यामधील नाते तुटल्याने गुन्हेगारी कारवाईला चालना मिळू शकत नाही. माहितीनुसार, 2019 मध्ये या तरुणीने, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तरूणाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
दरम्यान , न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि एन कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा खटला फेटाळून लावला. तरुणाचे मुलीशी दीर्घकालीन नाते आणि शारीरिक संबंध होते, याचा अर्थ मुलीचीही त्याला संमती होती, असे न्यायालयाने मानले. न्यायालयाने म्हटले आहे की, ‘जोडप्यांमधील सहमतीपूर्ण नातेसंबंध तुटले म्हणून फौजदारी कारवाई सुरू करता येणार नाही. पक्षांमध्ये सहमतीपूर्ण संबंध असतील आणि या संबंधाचा परिणाम वैवाहिक संबंधात होत नाही म्हणून, त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुन्हेगारीचा रंग दिला जाऊ शकत नाही.’
लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पुरुषाविरुद्धचा खटला फेटाळताना न्यायालयाने म्हटले आहे की, ‘स्वैच्छिक संमती नसताना तक्रारदार अपीलकर्त्याला भेटत राहिला किंवा तिच्या दीर्घकालीन संबंध ठेवले हे अकल्पनीय आहे. म्हणजेच या संबंधांना मुलीची संमती होते असे दिसते. आता ब्रेकअप झाल्यानंतर मुलाविरुद्ध बलात्काराचा खातालां चावला जाऊ शकत नाही.’