10 हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
10 हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात; नाशिक जिल्ह्यातील प्रकार
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- 10 हजारांची लाच घेताना दिंडोरी तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

शांताराम पोपट गांगूर्डे (वय ५१) तलाठी सज्जा कसबे वणी ता . दिंडोरी वर्ग-३, रा. ध्रुव नगर, मोतीवाला मेडिकल कॉलेज समोर, रेणुका हाइट्स, फ्लॅट नंबर ९, सातपुर नाशिक असे लाच घेणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांची मालकीची कसबे वणी ता. दिंडोरी येथील शेत जमीन गट न. ६१७ वर कर्ज काढावयाचे होते. त्यामुळे ते कसबे वणी गांवचे तलाठी गांगूर्डे यांना भेटून त्यांच्या मालकीच्या वर नमूद शेत गटाचे फेरफार नोंदी मिळणे बाबत विनंती केली.

सदर फेरफार नोंदी ह्या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे गांगुर्डे यांनी तक्रारदार यांना सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे तहसील कार्यालय दिंडोरी येथे गेले असता त्यांना पाहीजे असलेल्या नोंदी मिळाल्या परंतु सध्याच्या तीन नोंदी त्यांना वणीचे तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितले. तक्रारदार पुन्हा तलाठी गांगूर्डे यांना भेटले असता, गांगुर्डे यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुम्ही विकत घेतलेल्या शेतगट नंबर ६१७ चे उताऱ्यावरील शेतजमीन आकाराबाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत.

त्या दुरुस्त करण्यासाठी मला पैसे दिले तर मी तुम्हाला त्या दुरुस्ती करून फेरफार नोंदी देवु शकतो असे सांगितले. गांगुर्डे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना गांगुर्डे यांना लाच द्यावयाची नसल्याने, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दिनांक २५/०९/२०२४ रोजी लाच पडताळणी कारवाई दरम्यान १००००/- रूपये लाचेची मागणी केली.

सदरची लाच रक्कम आज गांगुर्डे यांनी त्यांचे कार्यालयात शासकीय पंच साक्षीदार यांचे समक्ष १००००/- रूपयांची लाच स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरूध्द वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group