Nashik Crime : दामदुपटीच्या आमिषातून साडेचौदा लाखांची फसवणूक
Nashik Crime : दामदुपटीच्या आमिषातून साडेचौदा लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- येथील नीलेश जगताप नामक व्यक्तीने त्यांच्या कॅपिटल ग्रोथ कंपनीत केलेल्या गुंतवणुकीवर दरमहा डबल पैसे मिळतील, असे आमिष दाखवून तब्बल 14 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली, अशी तक्रार सुहास धनराज गोपाळ (वय 29, रा. अमृत अंगण, पारसिक कॅफेजवळ, खारेगाव, कळवा, जि. ठाणे) यांनी वाडीवर्‍हे पोलिसांकडे नोंदविली आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नीलेश जगताप याने सुहास गोपाळ यांच्याशी मैत्री करून त्यांच्या कॅपिटल ग्रोथ कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा डबल पैसे दिले जातील, असे आमिष दाखवून रोख व बँक डिपॉझिटच्या मार्गाने 14 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 18 एप्रिल 2024 ते दि. 4 ऑगस्ट 2024 दरम्यान ट्विन माऊंटन फार्म, पहिने, ता. त्र्यंबकेश्‍वर येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याचे हवालदार गांगुर्डे हे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group