लग्नाचे नाटक करून तरुणीची 70 लाख रुपये व दोन किलो सोने घेऊन फसवणूक
लग्नाचे नाटक करून तरुणीची 70 लाख रुपये व दोन किलो सोने घेऊन फसवणूक
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- तरुणीसोबत लग्नाचे नाटक करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्याकडील 70 लाख रुपये व दोन हजार ग्रॅम सोने घेऊन तिची व तिच्या कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही गंगापूर रोड परिसरात राहते. जुलै 2016 ते दि. 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ही विवाहिता गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथे सासरी नांदत होती. त्यादरम्यान आरोपी पती आदित्य व सासरच्या पाच जणांनी संगनमत करून तरुणीसोबत लग्नाचे खोटे नाटक केले.
तरुणीसोबत लग्नानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला मारहाण केली, तसेच पीडितेकडून वेळोवेळी पैशांची मागणी करून 70 लाख रुपये घेतले, तसेच तिच्या अंगावरील 1 हजार 994 ग्रॅम वजनाचे सोने व स्त्रीधन काढून घेत तिला त्रास दिला, तसेच वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. पती व सासरच्या इतर पाच नातेवाईकांनी फिर्यादीकडून व फिर्यादीच्या माहेरच्यांकडून वेळोवेळी पैसे घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली.


या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध छळवणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार बागूल करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group