नाशिकमध्ये
नाशिकमध्ये "या" दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
img
दैनिक भ्रमर
नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरामधील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे स्काडा प्रणाली बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे करावयाच्या विविध कामांच्या अनुषंगाने तसेच बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथील नव्याने उभारण्यात आलेल्यासबस्टेशनची चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटीकं.लि. यांनी शटडाऊनचे नियोजन केले आहे.

हे काम शहरातील सर्व भागातील विविध जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ येथे करायचे असल्याने सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद ठेवण्याची
आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन,चेहेडी पंपिंग स्टेशन, मुकणे धरण पंपिंग स्टेशन बंद ठेवणे क्रमप्राप्त असणार आहे. तसेच मान्सुनपूर्व तयारीच्या अनुषंगाने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे सबस्टेशन मधील विविध प्रतिबंधात्मक देखभालीची कामे करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन या कालावधीत पंपीग करता येणार नसल्याने दरम्यान मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार आहेत. त्यामुळे संपुर्ण नाशिक शहरास दि.10/05/2025 रोजी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा करणे
शक्य होणार नाही. तसेच रविवार दि. 11/05/2025 रोजी सकाळचा पाणी पुरवठा
कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी मनपास सहकार्य करावे असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group