अन्न आणि औषध प्रशासन विभागाची  मोठी कारवाई  ! नाशिकमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर जप्त
अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई ! नाशिकमध्ये तब्बल 239 किलो बनावट पनीर जप्त
img
दैनिक भ्रमर
नाशिकमध्ये  अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून मोठी कारवाई केली असल्याचं समोर आले आहे.  नाशिकमध्ये शेकडो किलो बनावट पनीर अन्न औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आलंय. तब्बल 47 हजार 800 रुपये किंमतीचं 239 किलो बनावट पनीर जप्त करत ते नष्ट केलंय.

नाशिकच्या अंबड इथल्या साई इंटरप्राईजेस या कारखान्यावर छापा टाकत हा बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आलाय. जप्त केलेले पनीर निळी शाई टाकून नष्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विधानसभेतही बनावट पनीरचा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. त्यानंतर आता पनीरचा हा बनावट साठा जप्त करण्यात आल्यानं ग्राहकांनीही तुमच्या ताटात बनावट पनीर तर नाही ना याची खातरजमा करावी.

दरम्यान, चीज अॅनालॉग अर्थात बनावट पनीर संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती.  याबाबत भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी माहिती दिली. दररोज भेसळीच्या धक्कादायक बातम्या येत आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या पथकानेही यासंदर्भात अनेक छापे टाकले आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group