नाशिकमध्ये चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आज पाथर्डी गाव परिसरात असाच प्रकार घडला.
फिर्यादी शृंखला सुदाम कोंबडे (रा. कोंबडे गल्ली, रा. पाथर्डी गाव) या काल (दि. 6) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वरनगर येथून पायी जात होत्या. त्यावेळी मोटारसायकलीवरून तिघे जण आले. या तिघांपैकी मोटारसायकलीवर मध्यभागी बसलेल्या अज्ञात इसमाने कोंबडे यांच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाचे व 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने खेचून चोरून नेले.
मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या त्या पत्नी आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.