
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नवले कॉलनी रोड च्या बाजुला असलेल्या प्रेस च्या मैदानावर एका युवकाचा दगड डोक्यात टाकून ठार केल्याची घटना घडली आहे. या मुळे खळबळ उडाली आहे.
सिन्नर फाटा स्टेशन वाडी येथील अजय शंकर भंडारी (वय २४)असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ याने सांगितले की, काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना पुतळ्या समोरील नवले कॉलनी रोड च्या बाजुला असलेल्या प्रेस च्या मैदानावर अजय भंडारी याचा मृतदेह आढळून आला.
माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह च्या बाजुला दोन दगड मिळून आले असून धारदार शस्त्राने त्यांच्या बोटावर, हातावर वार असल्याचे दिसून आले. तर रस्त्यावर त्याची Activa MH 15 GY 8057 मिळून आली.
सिन्नर फाटा रेल्वे स्थानकावर पार्किंग वर काम करणारा अजय भंडारी हा रात्री शिवजन्मोत्सव च्या मिरवणुकीत नाचला व रात्री दिड वाजेला आई शी बोलला असल्याचे सांगितले.
त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.