9 वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करत स्वतः आई वडिलांनी आत्महत्या करण्याचं प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. एका खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आई वडिलांनी हे धक्कादायक पाऊल उचलेले असलायची माहिती आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात ही घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आईचा मृत्यू झालाय तर वडील गंभीर जखमी झाले आहे. वडिलांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी खासगी सावकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , वैभव हांडे यांनी एका खाजगी सावकाराकडून अंदाजे 4 ते 8 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतलं होतं. त्याची परतफेड करण्यासाठी सावकार शिवीगाळ आणि मारहाण करत होता. खासगी सावकार आणि त्याची माणसं रोज दारात येऊन धिंगाणा घालत होते. त्यामुळे या जाचाला कंटाळून वैभव हांडे यांनी 17 जानेवारी रोजी आत्महत्येचा निर्णय घेतला. आधी त्यांनी मुलाचा गळा आवळून त्याला ठार मारलं. नंतर वैभव हांडे आणि पत्नी शुभांगी हांडे यांनी गळफास गेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात 36 वर्षीय शुभांजी हांडे यांच्या मृत्यू झाला. तर ,वडील वैभव हांडे हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वडिलांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं.
दरम्यान , घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा वैभव हांडे यांचा शरिराची हालचाल सुरू होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. वैभव हांडे यांच्या जबाबवरून फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी आरोपी सावकार संतोष कदम, एक महिला आरोपी, संतोष पवार, जावेद खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे.तसेच, ज्यावेळी 9 वर्षीय मुलाने सुद्धा आत्महत्या केली अस गृहीत धरण्यात येत असताना त्याचा शव विच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्याची प्राथमिक दृष्ट्या गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निदर्शनात आलं आहे. त्यामुळं पोलिसांनी वडिलांवर ही गुन्हा दाखल केला आहे. या बाबतचा अधिकचा तपास चिखली पोलीस करत आहेत.