पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी गुनाटला पोलिसांचा घेराव
पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी गुनाटला पोलिसांचा घेराव
img
दैनिक भ्रमर
राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून महिला अत्याचाराच्या  घटना सतत घडत आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्थववर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कालच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात  बस मध्ये एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे


 बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर आता राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथक तयार केली असून, आरोपीचा शोध सुरू आहे, त्याची माहिती देणाऱ्याला बक्षिसाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे, त्याच्या गावात देखील पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.गुनाट गावाला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे, मोठा फौजफाटा या गावात तैनात करण्यात आला आहे. सर्वत्र पोलीसच -पोलीस दिसत आहेत.ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं पोलीस या गावात आरोपीचा शोध घेत आहेत, मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये.दरम्यान आरोपी रात्री गावात आला होता, त्याने एका घरात पाणी मागितलं असा दावा येथील ग्रामस्थांनी पोलिसांशी बोलताना केला आहे.

आरोपीची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून एक लाख रुपयांच्या बक्षिसाची देखील घोषणा करण्यात आली आहे, मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. दरम्यान आरोपी ज्या गावचा रहिवासी आहे, त्या गुनाट गावात आरोपीचा शोध घेतला जात आहे. या गावाला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालं असून, या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ड्रोन आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं या आरोपीचा शोध सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group