10 हजारांची लाच घेताना नगर भुमापन अधिकाऱ्यास अटक; 20 हजारांची केली होती मागणी
10 हजारांची लाच घेताना नगर भुमापन अधिकाऱ्यास अटक; 20 हजारांची केली होती मागणी
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- 10 हजारांची लाच घेताना नगर भुमापन अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ पकडले आहे. भास्कर गंगाधर वाघमोडे (वय 55, नगर भूमापन अधिकारी धुळे, वर्ग-2 रा. सुयोग कॉलनी, जि. टी. पी. स्टॉप, देवपूर, धुळे, जि. धुळे.) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी या प्लॉटच्या मूळ मालकाने नगर भूमापन कार्यालय, धुळे येथे अर्ज केलेला होता.

या अर्जावरून भास्कर वाघमोडे यांनी क्षेत्र दुरुस्ती करण्याचे आदेश काढले होते. या आदेशावरून मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी वाघमोडे यांनी 20,000 रुपये लाचेची मागणी करून 10,000 रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून उर्वरित 10,000 रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. 

सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता वाघमोडे यांनी त्यांच्या कार्यालयातील परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्याकरिता 10,000 रुपये लाचेची मागणी करून ही लाचेची रक्कम तक्रारदार यांचे कडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पो. हवा. राजन कदम, पो.कॉ.रामदास बारेला,मकरंद पाटील, प्रवीण पाटील यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group