सातपूर औद्योगिक वसाहती मधील मुलींच्या आयटीआय मागे असलेल्या जहागीर कंपनी समोर युवकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रयत्न शनिवार (दि 8) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडलेला आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास बोरसे वय 22 राहणारा पंचवटी याने रुपेश सूर्यवंशी वय 18 या युवकावर कोयत्याने हल्ला केला आहे.
जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार सातपूर पोलीस तपास करत आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत गेल्या आठवड्यात तीन ते चार टपऱ्यां फोडत लूट मार करण्याची घटना घडली होती. रात्रीच्या वेळेला कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांवर ही हल्ला करत लूटमार घटना घडत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये पोलीस गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी कामगार वर्ग करत आहे.