Nashik : २६ लाख रुपये परत न करता महिलेची फसवणूक
Nashik : २६ लाख रुपये परत न करता महिलेची फसवणूक
img
दैनिक भ्रमर


नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- न्यायालयीन प्रकरणात तडजोडीअंती ठरलेली २६ लाखांची रक्कम परत न करता एका महिलेची फसवणूक करणार्‍या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांनी दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी समजूतपत्र दिले होते. या समजूतपत्रामध्ये आरोपी प्रशांत रवींद्र पोतदार याला जामीन अर्जास सहकार्य करणे, तसेच इतर आरोपी रवींद्र पोतदार, रेणुका पोतदार व प्रशांत पोतदार यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जास फिर्यादी यांनी न्यायालयात हरकत नसल्याचे लिहून दिले; परंतु इतर आरोपींनी प्रशांत पोतदार हा जामिनावर सुटल्यानंतर ते आजपर्यंत तडजोडीअंती ठरलेली २५ लाख ७२ हजार ६२० रुपयांची रक्कम फिर्यादी पंडित यांना परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात प्रशांत पोतदार, रवींद्र पोतदार व रेणुका पोतदार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group