विवाहबाह्य संबांधातून अनेक गुन्हे घडत असल्याचा घटना घडत असतात.अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक महिलेने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियकरासह मिळून आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली. मृत व्यक्तीची ओळख पटली असून, त्याचं नाव रोहित आहे. 33 वर्षीय रोहित ढोल सराईचा रहिवासी होती. रोहित आपली पत्नी समारी बाईच्या घऱी म्हणजे सासरी घऱजवाई बनून राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैच्या रात्री रोहितने आपल्या पत्नीला प्रियकरासह आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं. यानंतर संतापलेल्या समारी आणि तिच्या प्रियकराने लोखंडी रॉडने मारहाण करत त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर ते मृतदेह घेऊन गेले. त्यांनी 20 किमी दूर राष्ट्रीय महामार्गावर मृतदेह पुरुन टाकला.
या प्रकरणाविषयी अधिक माहित अशी की , रोहित आपल्या घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांना संशय आला. ते पेंड्रा गावात पोहोचले होते. समारीने त्यांना रोहित काम करण्यासाठी आंध्र प्रदेशात गेला आहे असं सांगितलं. रोहितचे वडील पुतीन यांनी आसपासच्या लोकांकडे चौकशी केली. पण रोहित आंध्र प्रदेशला गेल्याचा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही. यानंतर पुनीत यांनी पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
तपास केला असता हत्येचा उलगडा झाला. यानंतर समाई बारीला अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गाजवळ पुरण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस सध्या आरोपी प्रियकराचा शोध घेत आहेत.
चौकशीदरम्यान पत्नीने पोलिसांना सांगितलं की, तिचं घरासमोर दुकान असणाऱ्या 49 वर्षीय प्रकाश कश्यपशी लग्नाच्या आधीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतर पती दोघांमधील अडथळा ठरत होता. यानंतर त्यांनी पतीच्या हत्येचा कट आखला. एसडीओपी बाजी लाल सिगं यांनी सांगितलं की, हे प्रकरण गंभीर असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपी प्रियकराचा शोध घेण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहेत.