आता ही निवडणूक लढणार, राज ठाकरेंनी भेट नाकारल्यावर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया
आता ही निवडणूक लढणार, राज ठाकरेंनी भेट नाकारल्यावर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया
img
दैनिक भ्रमर
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून उमेदवारी वरून राजकीय वर्तुळात मोठं मोठ्या घडामोडी घडत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून यावेळी पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. 

दरम्यान, सदा सरवणकर यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असताना सदा सरवणकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.  सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी आज शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र राज ठाकरे यांनी सदा सरवणकर यांची भेट नाकारली. मला यावर आता काहीही बोलायचं नाही, तुम्हाला उभं राहायचं  तर राहा. नसेल राहायचं  तर राहू नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सदा सरवणकर यांनी म्हटलं की, मी माझ्या मनाची तयारी केली होती. मात्र राज ठाकरे हे भेटायलाच तयार नसल्यानं माझा नाईलाज आहे. त्यामुळे आता मी ही निवडणूक लढणार आहे, असं सरवणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरवणकर यांनी आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group