नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडल्याने नाराज असलेल्या डॉ. पाटील यांची काँग्रेस पक्षात घुसमट होत असल्याने त्या लवकरच पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या तीन-चार महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागू शकतात संकेत दिले. या महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत त्या पक्षाचा राजीनामा देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील नाराज होत्या. अनेक वर्ष पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाला अशी त्यांची भावना आहे. “पक्ष नेतृत्वाने पूर्णतः दुर्लक्ष केले. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मश्गुल आहेत” असे हेमलता पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे. कुठल्या पक्षात जायचे, याबाबत दोन दिवसात निर्णय घेणार असल्याच त्यांनी सांगितले. त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.
पोस्ट पाहण्यासाठी खाली क्लिक करा