वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
img
Dipali Ghadwaje
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहकरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान  वाल्मिकी कराडच्या शरणागतीनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जे या प्रकरणात दोषी असतील त्या कोणालाच आम्ही सोडणार नाही असा इशारा यावेळी फडणवीस यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी माझं फोनवर बोलणं झालं आहे. या घटनेत जे दोषी असतील त्या कोणालाच सोडणार नाही. प्रत्येक दोषींवर कारवाई करणार. जाणीवपूर्वक हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. ज्यांचा -ज्यांचा या घटनेत सहभाग आहे, त्या प्रत्येकावर कारवाई होणार. आम्ही कोणालाही सोडणार नाही, मात्र ज्यांना यामध्ये राजकारण महत्त्वाचं वाटत त्यांना ते लखलाभ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group