भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी;  'या' पदावर नियुक्ती
भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्ती
img
दैनिक भ्रमर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन समित्यांची आणि त्यांच्या प्रमुखांच्या नावाची घोषणा शनिवारी (२८ डिसेंबर) केली. प्रदेश संघटन पर्व समिती, प्रदेश अनुशासन समिती आमि प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान अशा तीन समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान  भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज केली आहे. 

रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश अध्यक्षांप्रमाणेच रविंद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.  

रवींद्र चव्हाण  हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे आत्ताचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूलमंत्रिपद मिळाले आहे, त्यानंतर आता रवींद्र चव्हाण  यांना भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group