राज्यात महायुतीचं सरकार आलं असून मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये पार पडला. दरम्यान जरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी मंत्र्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आलेलं नाही. खाते वाटप कधी होणार याकडे मंत्र्यांसोबतच सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी खाते वाटप होण्याची शक्यता आहे.
दरम्यान त्यापूर्वी शिवसेनेच्या संभाव्य खाते वाटपाची यादी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास तसेच गृहनिर्माण खांत मिळण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रालय, भरत गोगावले यांना रोजगार हमी मंत्रालय, प्रकाश आबिटकर यांना पाणीपुरवठा, उदय सामंत यांना उद्योग किंवा आरोग्य मंत्रालय तर शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क किंवा महसूल खातं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.