केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटताना दिसत आहे . तसेच या वाक्व्यावरून विरोधकांकडून कडाडून विरोध होत आहे. दरम्यान अमित शहा यांनी यावर स्पष्टीकरण देत माझं वक्तव्य काँग्रेसने मोडतोड करून दाखवलं असल्याच्या आरोप अमित शहा यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान दिल्लीत हिवाळी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी रान उठवलेलं. काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले आहे. माझे पूर्ण वक्तव्य राज्यसभेच्या रेकॉर्डवर आहे. काँग्रेसने माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं, असा आरोप अमित शाह यांनी काँग्रेसवर केला आहे.
तसेच , माझे पूर्ण वक्तव्य राज्यसभेच्या रेकॉर्डवर आहे. मी किंवा माझा पक्ष स्वप्नातही बाबासाहेबांचा अपमान करु शकत नाही. ज्यांनी आयुष्यभर बाबासाहेबांचा अपमान केला. त्यांच्या सिद्धांतांचा विरोध केला आहे. त्यांना भारतरत्न दिला नाही. ते बाबासाहेबांच्या नावावर आता संभ्रम निर्माण केले. ते आपल्या जुन्या नितीवर आले. त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत जनतेपर्यंत नेला आहे. मी काँग्रेसच्या या प्रयत्नाचा निषेध करतो. काँग्रेसच्या या कृत्याविरोधात काय कायदेशीर कारवाई करता येईल, त्याचा विचार आम्ही करणार आहे.
काय होतं ते वक्तव्य?
आंबेडकरांचं नाव घेण्याची सध्या फॅशन झाली आहे, देवाचं नाव घेतलं असतं, तर सात पिढ्या स्वर्गात गेल्या असत्या.