गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात बाबाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. या वक्तव्यावर विरोधकांनी चांगलीच टीकेचा झोड उठविला आहे. दरम्यान, आता शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकयांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून भाजप सातत्याने देशातील महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंग कोश्यारी यांचे विधान असो किंवा गृहमंत्री अमित शहा यांचे मंगळवारी संसदेत केलेले भाषण असो, भाजप नेते नेहमीच महापुरुषांचा अपमान करत आले आहेत. असं उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
अमित शाह यांनी संसदेतील आपल्या भाषणात म्हटलं होतं की, 'आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची आता फॅशन झाली आहे, जर तुम्ही देवाचे इतके नाव घेतले असते तर तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता.' अमित शहा यांच्या या विधानंतर देशभरातील विरोधी पक्षांनी आक्षेप व्यक्त केला आहे.
तसेच , या महापुरुषाच्या अवमानाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भाजप हा तोंडात राम आणि बाजून सुरी ठेवणारा पक्ष असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला आहे. गृहमंत्र्यांना आंबेडकरांवर वक्तव्य करायला सांगणारे पंतप्रधान होते का? 'वन नेशन वन इलेक्शन' हे नवे विधेयक भाजपने संसदेत सोडावे आणि आधी आंबेडकरांबद्दल बोलावे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.