राष्ट्रवादीला ''ही'' खाती मिळणार ? ''हे'' महत्वाचे खातेही दादांच्या पदरी पडणार ?
राष्ट्रवादीला ''ही'' खाती मिळणार ? ''हे'' महत्वाचे खातेही दादांच्या पदरी पडणार ?
img
दैनिक भ्रमर
रविवारी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी परत पडला असून अजूनही खातेवाटप झालेले नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच गोंधळ पाहायला मिळतोय. दरम्यान आता,  महायुतीच्या  मंत्रिमंडळाचे खातेवाटप लवकरच होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ आणि नियोजनसह काही जुनी खाती आणि राज्य उत्पादन शुल्क हे नवीन खातं मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार अर्थ खातं सांभाळतील, तर शिवसेनेला जुनीच खाती मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची खाती कुणाला मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप आज किंवा उद्या होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रीही आपल्याला कोणतं खातं मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही आपल्याला कोणती खाती मिळणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेने गृहखात्यासाठी बराच आटापिटा केला. पण त्यांच्या पदरी निराशा आली. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडचं अर्थ खातं फडणवीस स्वत:कडे ठेवणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अजितदादांकडे अर्थ खातं राहणार की नाही असं बोललं जात होतं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थ खातं अजितदादांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे जुनीच खाती येणार आहेत. त्यांना एकच नवं खातं दिलं जाणार आहे. मात्र खात्यात अदलाबदलीही होणार नसल्याचं सांगण्यात आलं. अर्थ आणि नियोजन, महिला आणि बालकल्याण, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि बंदरे, मदत पुनर्वसन, अन्न नगरी पुरवठा आणि अन्न औषध प्रशासन ही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यात राज्य उत्पादन शुल्क हे खाते नव्याने राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या खाते वाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीत मकरंद पाटील यांना सहकार खातं मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा स्वत:कडे अर्थ आणि नियोजन खातं ठेवणार आहेत. तर आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे. दत्ता मामा भरणे यांच्याकडे कृषी, तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद दिलं जाणार आहे. तसेच हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय राष्ट्रवादीला राज्य उत्पादन शुल्कही दिलं जाणार आहे. अजित पवार हे खातं स्वत:कडे ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group