राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. पण अखेरीस हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्ताराचा शपथविधी सोहळा पार पडला . तब्बल 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेनं ज्या मंत्र्यांना शपथ दिली आहे. त्यांना एक अटही घातली आहे. शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी ना हरकत पत्र लिहून दिलं आहे. त्यामुळे अडीच वर्षांचा कार्यकाळ बंधणकारक केला आहे. अडीच वर्षानंतर शिवसेना आपल्या मंत्र्यांचा राजीनामा सुद्धा घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इच्छुक आमदारांना ऐन वेळी फोन करून संधी दिली. आपले आमदार नाराज होऊ नये म्हणून तिन्ही पक्षांनी काळजी घेतली. शिवसेनेनं आणि अजित पवार गटाने आपल्या मंत्र्यांकडून शपथपत्रचं लिहून घेतलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रातील सगळ्या मंत्र्यांनी अडीच वर्षात आमचे मंत्रिपदामध्ये बदल करण्यास आमची हरकत नाही असं लिखित पत्र दिलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुक आमदारांना पुन्हा मंत्रिपदासाठी मार्ग मोकळा ठेवला आहे.