मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर,केली
मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर,केली "ही" मोठी घोषणा
img
Dipali Ghadwaje
मुख्यमंत्रि‍पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ॲक्शनमोडवर आले आहेत. आपल्या सरकारची पुढील दिशा कशी असेल, याबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय.

नोकरी-रोजगार उपलब्ध करण्यासाठी अनेक योजना राबवण्यासाठी त्यांनी रूपरेषा तयार केली आहे. दीड लाख नोकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत.

एका मराठी वृत्त संस्थेने  याबाबतचे वृत्त दिले आहे. राज्यात विविध योजना राबवण्यासह तरूणांना सरकारी नोकरी मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यातील तरूणांसाठी लवकरच १.५ लाख रोजगार उपलब्ध करण्यात येतील, त्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, असे आदेश त्यांनी सोमवारी दिल्याचं समोर आलेय. त्यामुळे लवकरच बंपर सरकारी नोकऱ्या राज्यातील तरूणांसाठी उपलब्ध होतील, असे म्हटलंय जातेय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

आधीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची बढती प्रक्रिया पूर्ण करा. नंतर नवीन भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरूवात करा. तसेच नवीन भरती आणि विद्यमान कर्मचार्‍यांना डोमेन ज्ञान आणि तंत्रज्ञान अवलंबन यावर लक्ष केंद्रीत करणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणतात, सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक वेळ फ्लिडमध्ये घालवावा लागेल. जिल्ह्यांमध्ये सचिवांच्या भेटींसाठी तपशीलवार वेळापत्रक तयार करा. सरकारी कार्यक्रम आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणा मजबूत करा. 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group