केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले यांच्याकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त
img
दैनिक भ्रमर
आज महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला असून भाजप पक्षाचे १९, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात  ३३ कॅबिनेट सहा राज्यमंत्री झाले. मात्र यांनतर काही नेत्यांन मध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेत काही मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. 

विशेष म्हणजे आज महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीचा नागपुरात कार्यक्रम पार पडला. तर दुसरीकडे रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. “मी शिर्डीत लढण्यासाठी इच्छुक होतो. अजून एखादी जागा मिळाली असती तर दोन जागा आमच्या निवडून आल्या असत्या. लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला जागा मिळाली नाही. विधानसभेत तीन ते चार जागा मिळतील याची अपेक्षा होती. मात्र एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे”, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

“देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र त्यांनी अनेकवेळा आम्हाला एमएलसी आणि मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विधानसभा निवडणुकीत सांगितलं होतं की जागा देत नसाल तर आम्हाला मंत्रिमंडळात पहिल्यांदा सन्मान द्या. मागच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी सांगितलं होतं की, तुम्हाला मंत्रिपद देऊ. मात्र अडीच वर्ष मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही”, अशा शब्दांत रामदार आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच, “आम्ही प्रामाणिकपणाने महायुती आणि भाजपसोबत आहोत. आमचा पक्ष मोठा आहे. मात्र आमच्या पक्षात कुठल्या कार्यकर्त्यांना मंत्रीपद मिळत नाही ही बाब मनाला दुःख देणारी आहे. मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाचा विचार न केल्याने आमच्या पक्षात नाराजी आहे. आमचा पक्ष तुमच्यासोबत असताना असं करत असाल तर ही बाब गंभीर आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group