बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे अक्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणामुळे राजकारणात अनेक घडामोडींना वेग आल असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे .
दरम्यान, बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली आहे.तसेच मोर्च्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधकांनीही सरकार चांगलेच घेरले आहे. या मोर्च्यात सर्व पक्षीय नेत्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
या मोर्च्यात नागरिकांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच आरोपीच्या संपत्ती जप्त करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.