राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळाचे खातेवाटप देखील त्यांनतर आता राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यात प्रशासकीय बदलास सुरुवात झाली असून १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत.
यादी खालील प्रमाणे
- डॉ. हर्षदीप कांबळे (IAS:RR:1997) प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांची महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री अनिल डिग्गीकर (IAS:RR:1990) महाव्यवस्थापक, BEST, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ.अनबलगन पी. (IAS:RR:2001) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, MAHAGENCO, मुंबई यांची सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री संजय दैने (IAS:SCS:2012)जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- डॉ. राधाकृष्णन बी. (IAS:RR:2008) मुख्यमंत्र्यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची महागेन्को, मुंबईचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री राहुल कर्डिले (IAS:RR:2015) जिल्हाधिकारी, वर्धा यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
- श्रीमती वनमथी सी. (IAS:RR:2015) सह आयुक्त, राज्य कर यांची जिल्हाधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री अवश्यंत पांडा, (IAS:RR:2017) आयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांची जिल्हाधिकारी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
- श्री संजय पवार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री विवेक जॉन्सन (IAS:RR:2018) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- श्री. अण्णासाहेब दादू चव्हाण (SCS पदोन्नती) उपायुक्त (महसूल) पुणे विभाग, पुणे यांची महात्मा फुले जिवंदाई आरोग्य योजना सोसायटी, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
- श्री. गोपीचंद मुरलीधर कदम (SCS पदोन्नती) यांची स्मार्ट सिटी, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.