राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षात फूट पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची मोठी फळी भाजपसोबत महायुतीत गेली सत्तेत बसली. पुढे विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं आणि भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार आलं.
अशातच आता पालिका निवडणुका तोंडावर असताना भाजपकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. पुण्यात उद्धव ठाकरेना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 6 माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार , माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत 5 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.