मोठी अपडेट  !  महायुतीत फूट ? शिंदे गटाच्या ''या'' महिला नेत्याचं मोठं वक्तव्य , नेमकं काय म्हणाल्या ?
मोठी अपडेट ! महायुतीत फूट ? शिंदे गटाच्या ''या'' महिला नेत्याचं मोठं वक्तव्य , नेमकं काय म्हणाल्या ?
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळविले, महायुती सरकारमधील भाजपसह मित्र पक्ष असलेले एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचै राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी   विधानसभा निवडणुकीत चांगलीच बाजी मारली. दरम्यान आता शिंदे गटातील एका महिला नेत्याने महायुती बद्दल मोठे वक्तव्य केले आहे.  मुंबई, ठाणे महापालिका निवडणूक एकत्र लढून मात्र उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही, असे भाष्य असे भाष्य एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चेना  उधाण आले आहे. 

 मुंबई आणि ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. शिवसेना मैत्रीपूर्ण लढतसाठी तयार असल्याचा दावा ही नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती म्हणून लढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. पुणे महानगर पालिका, मुंबई, ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. यामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. 

 राज्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला सकारात्मक वातावरण आहे. महापालिका निवडणुका लवकर घेऊन प्रशासकला बदलले पाहिजे, अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. मैत्रीपूर्ण लढतची जास्त शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांची वेगळी ताकद आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतची जास्त शक्यता आहे, असे ही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढणार की नाही यावर अजूनही भाष्य केले नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group