‘पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू  ’, ''या''  केंद्रीय  मंत्र्याने  केला मोठा आरोप
‘पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू ’, ''या'' केंद्रीय मंत्र्याने केला मोठा आरोप
img
दैनिक भ्रमर
परभणी शहरातील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या एका मनोरुग्णाने संविधानाच्या प्रतिकृतीची 10 डिसेंबर रोजी विटंबना झाली होती. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं.  यावेळी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी सह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचे समोर  समोर आले होते. यांनतर या प्रकरणानंतर हा मुद्दा तापला होता. सोमनाथ यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला यावर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज परभणीत जावून न्यायालयीतन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं होतं? ते समजून घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच मृत्यू झाला, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. 

 “सोमनाथ सूर्यवंशी लातूर जिल्ह्याचा रहिवासी होता. तो परभणीत लॉचा विद्यार्थी होता. आंदोलनात त्याचा काही संबंध नव्हता. तो तिथे फोटो काढत होता. पोलिसांनी सांगितले हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर युवकांमध्ये संताप होता. पकडून मारहाण करणे चुकीचे आहे. लॉकअपमध्ये मारहाण झाली. त्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला, असं आमचं म्हणणं आहे”, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

तसेच , “सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. पोलिसांनी अन्याय करणे बरोबर नाही. विटंबना करणारा मनोरुग्ण नाही. मी राज्याच्या पोलीस महासंचालक रक्ष्मी शुक्ला यांना या विषयी बोलणार आहे. आम्ही नक्की पाठपुरावा करू. आम्ही आरपीआय पक्षाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार आहोत. विजय वाकोडे यांचं स्मारक उभारण्यासाठी मनपाने जागा द्यावी. आम्ही आमच्या खात्यामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करू”, असं रामदास आठवले म्हणाले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी आंदोलक महिलांनी रामदास आठवले यांच्यासमोर चांगलाच आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी आम्हाला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करत महिलांनी आक्रोश केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group