निलकमल  बोट अपघात: आठ जण बेपत्ता, बचावकार्यासाठी नौदलाच्या बोटी अन् हेलिकॉप्टर
निलकमल बोट अपघात: आठ जण बेपत्ता, बचावकार्यासाठी नौदलाच्या बोटी अन् हेलिकॉप्टर
img
दैनिक भ्रमर
मुंबईत गेट ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशाने निघाल्या होत्या. या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. त्यानंतर ही बोट उलटली.  दरम्यान,  या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बोटीमध्ये ८० प्रवासी होते. त्यातील ७७ जणांना वाचवण्यात आले आहे. तसेच आठ जण बेपत्ता आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचावकार्याची माहिती घेतली. 

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.

दरम्यान शेकापचे नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी पोहचले. नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे बोट पूर्णपणे पाण्यात बुडली. अपघात कसा झाला, ते चौकशीतून समोर येईल. परंतु आधी बोटीमधील प्रवाशांना वाचवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान नौदलाकडून आमच्या बोटीने धडक दिल्याचा वृत्ताचा इन्कार केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group