मोठी अपडेट ! कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या गाडीवर पहाटे हल्ल्याचा प्रयत्न ?
मोठी अपडेट ! कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या गाडीवर पहाटे हल्ल्याचा प्रयत्न ?
img
दैनिक भ्रमर
कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसेंच्या वाहनावर मालेगावमध्ये टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. या घटनेनं मालेगावमध्ये एकच खळबळ  उडाली आहे. गो तस्करी थांबवण्यासाठी अविष्कार भुसे यांनी प्रयत्न केल्याचे समजते. त्यानंतर हा प्रकार घडला.

या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला आहे. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दर्शनाहून परतत असताना हा प्रकार घडला. आयशर गाडीत जनावर चोरून नेत असल्याचा संशय आल्याने अविष्कार भुसे यांनी वाहनातून पाठलाग केला होता. या प्रकरणी आरोपींविरोधात मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. 

अचानक घडलेल्या या प्रकारात अविष्कार भुसे यांनी केलेल्या धाडसामुळे गो-तस्करी थांबवण्यात यश आले असून काही गायींची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

या घटनेच्यावेळी संशयित दोन वेगळ्या गाडीतुन आले होते. त्यांच्यापैकी एकाने भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर रॉड मारला. संशयित व भुसे यांची गाडी डिव्हायडरला धडकली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group