दादागिरी, मारहाण अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून कायद्याचीही धाक न बाळगता काही लोकांकडून सर्रास पणे मारामारी सारखे तसेच अनेक प्रकारचे गुन्हे केले जातात. दरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्राध्यापकांनी महाविद्यालयाची तक्रार केली असल्याच्या संशयावरून कॉलेजच्या संचालकांकडूनच प्राध्यापकांना बेदम मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक महाविद्यालयात गेल्यानंतर संचालक मंडळासमोर गेले, त्यानंतर काहीही न विचारता संचालक मंडळाने प्राध्यापकांना लाठ्याकाठ्यांनी मारायला सुरूवात केली. मारहाण केल्यानंतर प्राध्यापकांना रस्त्यावर बसवण्यात आले. बाकी दोघेजण विचारणा करायला आले असता त्यांनाही हातात दगड घेऊन पळवून मारण्यात आलं आहे.
दरम्यान. समोर आलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाने केलेल्या या मारहाणीत प्राध्यापकांच्या पाठीवर, खांद्यावर, हातावर आणि मांड्यांवर मारल्याचे व्रण दिसून येत आहेत. याप्रकरणी संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.