बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यपीला महिलेने दिला चोप; वाचा कुठे घडली ही घटना
बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यपीला महिलेने दिला चोप; वाचा कुठे घडली ही घटना
img
दैनिक भ्रमर
बसमध्ये एका मद्यपीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या महिलेने त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही महिला शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या आपल्या पती व मुलासोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने त्यांची छेड काढली. मात्र, घाबरून न जाता या महिलेने त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. यानंतर त्या व्यक्तीला पोलीस चौकीत घेऊन गेल्या. या महिलेने घडलेला सर्व परकार माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना फोनद्वारे कळवला. यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले.

हा सर्व प्रकार सुरु असताना त्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवाशांनी या घटनेत कोणतीही मदत न करता दुसऱ्या बसमध्ये गेल्या. याबाबत पीडित महिलेने नाराजी व्यक्त केली असून, "आज महिलांनी एकत्र येऊन अशा घटनांना सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. एकीनेच आपण महिलांवरील अत्याचार रोखू शकतो," असे मत व्यक्त केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group