ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'पुष्पा 2 द रुल' चा धुमाकूळ, चित्रपटाच्या राइट्ससाठी ‘या’ प्लॅटफॉर्मने मोजले ''इतके'' कोटी
ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'पुष्पा 2 द रुल' चा धुमाकूळ, चित्रपटाच्या राइट्ससाठी ‘या’ प्लॅटफॉर्मने मोजले ''इतके'' कोटी
img
दैनिक भ्रमर
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2 द रुल’  चित्रपटाने देशभरात चांगलाच धुमाकूळ  घातला असून  तब्बल 1000 कोटींच्या पुढे कमाई केली.  एवढचं नाही तर चित्रपटाला रिलीज होऊनही आता 2 आठवडे होऊन गेले असले तरीही चित्रपटाची क्रेझ कमी होताना दिसत नाहीये.


दरम्यान,  या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्रेक्षक आता हा चित्रपट OTT वर येण्याची वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे कारण रिपोर्टनुसार या चित्रपटाचे राइट्स एका ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत.

‘पुष्पा 2 द रुल’ राइट्स तब्बल ‘इतक्या’ कोटींना 

यावरून हा चित्रपट लवकरच आता OTTवर रिलीज होणार असल्याचे संकेत आहेत. एका रिपोर्ट्सनुसार, नेटफ्लिक्स इंडियाने सर्व भाषांसाठी ‘पुष्पा 2 द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स विकत घेतले असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी त्यांना 270 कोटी रुपये द्यावे लागले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group