नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत कॅफेवर छापा
नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत कॅफेवर छापा
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शहरात आज गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रु वस्तीत विद्याविकास सर्कल परिसरामध्ये एका कॅफेमध्ये आ. देवयानी फरांदे यांनी छापा टाकला. या ठिकाणी तरुण-तरुणी गैरप्रकार करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यावेळी काही तरुण-तरुणींना देखील ताब्यात घेण्यात आले असून या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

 नाशिकसारख्या धार्मिक शहरात अनेक गैरप्रकार सुरु आहेत. कॅफेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना गैरप्रकार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे. या प्रकरणाची माहिती आमदार देवयानी फरांदे यांच्याकार्यकर्त्यांनी त्यांना ही माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी धडक कारवाई करण्याचे ठरविले. कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना देखील धक्का बसला. आमदार पोहचल्याचे कळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले.

कॅफे उघडून त्या ठिकाणी मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. काही कॅफेमध्ये तर तासांनुसार दर घेतले जातात. अंधार करुन काळे पडदे लावले जातात. नाशिकमध्ये मोगली नामक कॅफेत गैरप्रकार सुरु असल्याची माहिती आ.फरांदे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वत: त्या ठिकाणी जावून छापा टाकाला. त्यावेळी तरुण मुला मुलींना सुमारे १०० ते २०० रुपयांत रूम दिले जात असल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी कॅफेमध्ये अनेक मुला मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असून अशाच प्रकारे आणखी काही कॅफेवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group